भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका
कणकवली : भांडुप मध्ये संजय राऊत ला बसून मुंगेरीलाल के हसीन सपने पडत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली. आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. ज्या संजय राऊतनी साधी सरपंच निवडणूक लढवली नाही, तो टीका करतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा ठरेल, यामुळे पुन्हा महायुती सरकार येईल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी ते ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, संजय राऊतचे महात्मा गांधी यांच्यावरील प्रेम दिसून आले. राऊतने गांधीजी यांच्याबद्दल बोलण्याआधी बाळासाहेबांची भाषणे ऐकावीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असतील पण ते भाजपचे मोठे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अमित शहा येथे येत आहेत. अमीत शहा काय रसायन आहेत, हे संजय राऊत यांना कधी समजणार नाही. तसेच संजय राऊत केवळ भाकित करतोय. २०२९ मध्ये राऊत कोणत्या झाडावर असेल हे आधी पहावे लागेल, अशी सणसणीत टीका देखील आमदार नितेश राणे यांनी केली.
तर, महाराष्ट्राला सर्वात धोका मातोश्रीवरून आहे. आणि खरा धोका उद्धव ठाकरे पासून आहे. त्याला लंडनला पाठवा. अंबानी, अदानी यांच्यामार्फत राज्यात विकास होत असेल तर योग्य आहे. याचा खरा बॉस १० जनपथ वर बसतोय. अमित शहा राष्ट्रीय नेते आहेत. विजय वडेट्टीवार, तुमच्या पक्षाची स्थिती काय आहे, हे पहा. तुम्ही आमच्याबरोबर बाहेरगावी गेलात त्यावेळी तुम्ही काय सोनिया गांधी यांच्या बद्दल काय बोलायचे हे आम्ही सांगू शकतो, असा सल्लाही आ. नितेश राणे यांनी दिला.