मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री देव लखमेश्वर मंदिर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. हरिनाम सप्ताहात पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी आपली सेवा सादर केली. उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात व हरिनामाच्या नामस्मरणाने परिसर भक्तिमय बनला होता. बांदिवडे मळावाडी मंडळाने ‘ कालिका- रक्तबिज युद्ध ‘ चित्ररथ सादर केला. रात्री दिंडी मिरवणुकीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.