-3.8 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

तळवडे दुग्ध संस्थेचे माजी चेअरमन किशोर नाईक यांचे निधन 

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे मुरारवाडी येथील रहिवासी किशोर रामचंद्र नाईक (६१) याचे गोवा बांबोळी येथे अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांनी सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यामुळे सहकारातील एक जाणकार हरपल्याचे दुःख सहकार क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

मातोंड गावात प्रसिद्ध भात बियाणे खरेदी विक्रीचे व्यापारी म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर सहकारी दुग्ध व्यवसायिक संस्था मर्यादित तळवडे या संस्थेमध्ये संचालक म्हणून ते कार्यरत होते. या संस्थेचे दहा वर्षे चेअरमन पद त्यांनी भूषविले होते. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील होते.

त्यांच्या पक्षात पत्नी, मुलगा, भाऊ-बहीण, भावजय, पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार आहे. तसेच कर सल्लागार रामचंद्र नाईक यांचे वडील व निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका कोमल नाईक यांचे ते पती होत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!