मसुरे प्रतिनिधी : मसुरे येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक कृषी सहकारी संस्था मसुरे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त पाच लिटर गोडेतेल भेट म्हणून देण्यात आले. गेली पाच वर्षे सदर संस्था शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या विविध भेटवस्तू उत्सवाच्या दरम्यान तसेच दिवाळीमध्ये दिवाळी बोनस वितरित करत आहे. यावेळी सुमारे 80 शेतकऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ अलका विश्वास साठे, उपाध्यक्ष सौ पूजा पांडुरंग ठाकूर, सचिव सौ तन्वी हिंदळेकर तसेच रमेश पाताडे, सचिन गोलतकर, सिद्धेश मसूरकर, सुरेश मापारी, तुळशीदास चव्हाण, हेमंत बागवे, धनाजी बागवे, भारती सावंत, सोयल फकी, महंमद खान, किरण पवार, मुबारक मीर, गणेश परब , विकास ठाकूर, सुरज परब, सुमित सावंत, संतोष राणे, आबा अहिर, सतीश बांदिवडेकर, संदेश पवार, कृष्णा चव्हाण, श्री पाताडे तसेच पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेचे सर्व सभासद लाभार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शक यावेळी बोलताना या संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वास साठे म्हणालेत महिलांची ही दुग्ध संस्था येथील सभासदांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभी असून दूध उत्पादनातून एक मोठी क्रांती घडविली आहे. उत्सवाच्या दरम्यान या सर्व सभासदांना भेटवस्तू वितरित करण्याचा या संस्थेचा अनोखा उपक्रम नेहमीच कौतुकास्पद आहे. सिद्धेश मसुरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.