8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

२ वर्षापूर्वीच्या खूनाचा गुन्हा उघड ; तिन्ही आरोपींना अटक

दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस स्टेशन गुन्हा ८२/२४ भादवि क ३६५ मधील संशयित राजाराम गवस व मयताची पत्नीमध्ये वाद असल्याच्या संशयावरून यातील अपहरण झालेली व्यक्ती उमेश बाळू फाले, ३२ वर्ष, राहणार धनगरवाडी, मणेरी हा वारंवार आरोपी राजाराम गवस यास शिवीगाळ करत असे त्या गोष्टीचा राग मनात ठेवून, आरोपी राजाराम गवस व त्याचे साथीदार २ ) अनिकेत नाईक, ३ ) सचिन बांदेकर यांनी कट करून मयत यास दारू पिण्यासाठी म्हणून धाटवाडी, वडेश्वर मंदिर जवळ तिलारी ते बिचोली कॅनल जवळ घेऊन गेले व तेथे आरोपी २ याने त्याचे हात पकडले आरोपी ३ याने त्याचे पाय पकडले आरोपी १ याने मयताच्या गुप्तांगावर लाथा मारून तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून करून मयताची बॉडी सुमारे दीडशे मीटर फरपटत नेऊन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या तिलारी ते बिचोलीम कॅनॉलमध्ये टाकून दिली आहे. यातील
आरोपी १ ) राजाराम कांशीराम गवस २) सचिन महादेव बांदेकर ३ ) अनिकेत आनंद नाईक सर्व रा.उसप यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केले असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. सदर गुन्हामध्ये भा. द. वी. ३६४, ३०२, २०१, ३२८, १२०(B) हे कलम वाढवण्यात आलेले आहे.

पोलीस निरीक्षक निसर्ग उतारी पोलीस हवालदार राम मळगावकर, पोलीस हवालदार दीपक सुतार आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पथक यांनी मिळून पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!