0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

कणकवली बसस्थानकासमोर रसवंती गृहाच्या एका बाजूने कोसळली संरक्षण भिंत कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली ; रसवंती गृहाचे नुकसान

कणकवली : शहरातील कणकवली बस स्थानक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कणकवली यांच्या हद्दीवर असलेली चिरेबंदी संरक्षण भिंत अतिवृष्टीमुळे रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. बसस्थानकातील रसवंती गृहाच्या मागील बाजूने ही संरक्षण भिंत कोसळल्याने काही प्रमाणात रसवंती गृहाचे नुकसान झाले. सुदैवाने त्या ठिकाणी ग्राहकांची गर्दी नसल्याने जीवितहानी टळली आहे.

मात्र, संरक्षण भिंत कोसळल्याने संरक्षण भिंतीचा पुढील काही भाग धोकादायक बनला आहे. या कोसळलेल्या संरक्षण भिंतीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!