23.1 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

कणकवलीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे

कणकवली | मयुर ठाकूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याविषयी कणकवली तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवीत भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारले.

यावेळी गली गली मे शोर हाई … रामदास कदम चोर है, नीम का पत्ता कडवा है …. रामदास कदम भडवा है, रवींद्र चव्हाण तुम आगे बढो … हम तुम्हारे साथ है, नितेश राणे तुम आगे बढो … हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी सभापती दिलीप तळेकर यांनी यांनी तीव्र स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करताना यापुढे जशास तसे उत्तर देण्यात येईल असे स्पष्ट केले.

दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत रामदास कदम यांच्या पुतळ्यावर होणारे जोडो मारो रोखले.

तर शहराध्यक्ष आण्णा कोदे म्हणाले, महायुती म्हणून आम्ही आमच्या नेत्यांवर कोणीही काही बोलेल ते सहन करणार नाही. तसेच याबाबत आमही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन लक्ष वेधणार असल्याचेही सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पप्पू पुजारे, दिलीप तळेकर, सोनू सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोनू सावंत, सचिन पारधिये, विजय इंगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!