26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ६ मध्ये विकासकामांचे भाजप नेते निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांचे विकासकार्य उल्लेखनीय : निलेश राणे

कुडाळ, प्रतिनिधी: कुडाळ शहरातील वार्ड क्र. ६ मध्ये नगरोत्थान निधीतून विकासकामांचा लोकार्पण सोहळा भाजप नेते निलेशजी राणे यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आला. कुडाळ नगरपंचायतीच्या वार्ड क्र. ६ मधील कुडाळ बसस्थानक शेजारी असणाऱ्या संरक्षण भिंत सुशोभीकरण तसेच हायमास्ट लोकार्पण करण्यात आले.

नगरसेविका प्राजक्ता आनंद शिरवलकर यांनी नेहमीच विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कुडाळ शहरातील तसेच आपल्या वॉर्ड क्र. ६ मधील अनेक विकासकामे आजवर मार्गी लावली आहेत. यामुळे सामान्य लोकांना याचा मोठा फायदाही झाला आहे. खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि भाजप नेते निलेशजी राणे यांच्या विशेष प्रयत्नातून कुडाळ बसस्थानकाशेजारी असलेली संरक्षण भिंत सुशोभीकरण करण्यात आली आहे. यामुळे या भागामध्ये स्वच्छता तसेच नीटनेटकेपणा आला आहे. या भागात हायमास्टचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे कुडाळ एसटी स्टँडचा परिसर रात्रीच्या वेळी सुद्धा प्रकाशझोतात आला आहे. तसेच कुडाळ शहरात एकूण ५ हायमास्ट लावण्यात आले आहेत. या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी स्पष्ट केले की, कुडाळ शहराच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या प्राजक्ता शिरवलकर यांचे मनःपूर्वक आपण आभारी आहोत. कुडाळ शहराच्या विकासासाठी आवश्यक तो निधी यापूर्वी देण्यात आला असून भविष्यातही पुढील विकासकामांसाठी भरीव निधी देण्यात येईल अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली. यावेळी प्राजक्ता शिरवलकर यांच्या कामाचे विशेष कौतुक निलेश राणे यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान कुडाळ एसटी स्टँड येथील रिक्षा युनियनतर्फे भाजप नेते निलेश राणे यांचा विशेष सत्कार केला. येथील संरक्षण भिंत सुशोभीकरण झाल्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांचे आभार मानले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजप युवानेते आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक एड. राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, राकेश कांदे, आबा धडाम, चंदन कांबळी, स्वरूप वाळके, बंड्या कंदुरकर, राजा पडते, चेतन पडते, निखिल कांदळगावकर, प्रसन्न गंगावणे, रुपेश बिडये, जयेश चिंचळकर, राम बांदलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!