10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

कणकवलीत फुटणार आमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी

हिंदी, मराठी कलावंतांची असणार उपस्थिती

30 ऑगस्ट रोजी कणकवलीत आयोजन

कणकवली : आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या साठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये असणार आहे.

शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वाजल्यापासून उपजिल्हा रूग्णालय कणकवली समोरील पटांगणावर आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ पुरुष व महिलांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्री. नारायण राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार श्री. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, माजी आमदार श्री. प्रमोद जठार तसेच मराठी हिंदी सिनेसृष्ठीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थिती तसेच मुंबई येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राची संगीत रजनी होणार आहे.

४ था थर – ३०००/- रोख रुपये, ५ वा थर ५०००/- रोख रुपये, ६ वा थर – ७०००/- रोख रुपये, ७ वा थर २०,०००/- रोख रुपये, ८ वा थर २५,०००/- रोख रुपये व दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला सायकल तसेच सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येईल.

तरी या दहीहंडी उत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर, सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष संदिप मेस्त्री, शहराध्यक्ष श्री. अण्णा कोदे, यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!