9.7 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

पत्रकार संजय सावंत यांना पितृशोक 

फोंडा : विद्यानगर येथील ज्येष्ठ ग्रामस्थ सुभाष द्वारकानाथ सावंत ( ७८ वर्षे ) यांचे, पुणे येथे मंगळवार तारीख १६ रोजी वृद्धापकाळतील आजारपणात, औषधोपचार सुरू असताना, दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव फोंडाघाट येथे त्यांचे राहते घरी बुधवार तारीख १७ रोजी, सायंकाळी चार वाजता आणण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे,मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांनी एसटीमध्ये चालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर, काही काळ महाराष्ट्र स्टेट मायनिंग कार्पोरेशन, फोंडा या सिलिकामाईन्स मध्ये सेवा केली. मिश्किल आणि स्पष्ट वक्ते स्वभावामुळे ते फोंडाघाट मित्रपरिवार मध्ये लाडके होते.

फोंडाघाट तरुण भारतचे पत्रकार आणि फोंडाघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सावंत आणि संतोष- पुणे यांचे ते पिताश्री होत.त्यांच्या अंत्ययात्रेत सायंकाळी उशिरा सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आणि मित्र परिवाराने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाबद्दल फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये दुःख व्यक्त होत आहे…

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!