कणकवली : कणकवली पंचायत समितीतील सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल चव्हाण यांची आई श्रीमती सुगंधा भिकाजी चव्हाण ( वय 75 रा. घोणसरी ) यांचे अल्पशा आजाराने 15 जुलै रोजी रात्री पावणे बारा वाजता निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर घोणसरी येथील स्मशानभूमीत 16 जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत कणकवली पं स गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , पं स मधील अधिकारी, कर्मचारी , कणकवली तालुका चर्मकार समाज मंडळ तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्यासह ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुडाळ पं स मधील ग्रामविस्तार अधिकारी संजय ओरोसकर , मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी मंगेश पवार, जिल्हा परिषद पिसेकामते फळसेवाडी शाळेतील सहाय्यक शिक्षिका आरती चव्हाण यांच्या त्या सासू तसेच नेरूर जिल्हा परिषद केंद्रशाळेतील सहाय्यक शिक्षिका स्वाती ओरोसकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चत मुलगा, विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने घोणसरी गावात हळहळ व्यक्त होत आहे.