-7.3 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

रचना कोरगांवकर यांचे निधन

सावंतवाडी न.पं. च्या कर निर्धारण अधिकारी म्हणून होत्या कार्यरत

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधिक्षक तथा कर व प्रशासकीय अधिकारी रचना रामचंद्र कोरगांवकर (३९, रा. पावशी, ता. कुडाळ ) यांचे बुधवारी दुपारी निधन झाले. मंगळवारी त्या प्रकृती अस्वास्थामुळे लवकर घरी परतल्या होत्या. त्यानंतर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथून अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटना तसेच महाराष्ट्र म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग जिल्हा नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांचे वतीने त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!