28.3 C
New York
Thursday, July 25, 2024

Buy now

पिंगुळी येथे इमारतीचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून एकाची आत्महत्या

कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील आनंदवन या कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे अविनाश जाधव (वय ४८, मूळ राहणार अकोला) यांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या कॉम्प्लेक्स चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, अविनाश जाधव हे अकोला येथील असून ते चिपी एअरपोर्ट येथे कामाला होते. ते पत्नी मुलगा व मुलगी यांच्यासह पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील आनंदवन कॉम्प्लेक्स येथे भाड्याने राहतात. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतली. यामध्ये त्यांच्या डोक्याला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक रूणाल मुल्ला तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात पंचनामा केला. प्राथमिक तपासात अविनाश जाधव यांनी आत्महत्या केली असा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यांनी आत्महत्या का केली याचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!