ऋतुजा परब प्रथम, तन्वी करंगुटकर द्वितीय, तर सृष्टी तांबे तृतीय
कणकवली | मयुर ठाकूर : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडावची माध्यमिक शालांत परिक्षेत तब्बल १३ व्या वर्षी १००% निकालाची परंपरा कायम राहिली असून २०२४ च्या माध्यमिक शालांत परीक्षेचाही निकाल १००% लागला आहे.
प्रशालेत ऋतुजा रवींद्र परब (९५%) गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तन्वी महेश करंगुटकर ( ९४.२०%) गुण मिळवून द्वितीय तर सृष्टी विद्याधर तांबे हि ( ९३.८०%) गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.
प्रशालेतून तब्बल २२ विद्यार्थी माध्यमिक शाळांत परिक्षेकरिता प्रविष्ठ झाले होते. यातील सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाहक काशीराम गावकर, शालेय समितीचे अध्यक्ष श्रीम. भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गावकर, सदस्य विजय सावंत, गणेश मस्कर, प्रशालेचे मुख्याध्यापक मुकेश पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.