28.9 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे हायस्कूल १०० % निकाल

कु.महाविश मुल्ला ९४.२० % गुण मिळवून प्रथम

वारगाव : शनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे इंगजी माध्यमाच्या शाळेचा १० वी मार्च २०२४ बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागला असून आपल्या १०० % निकालाची परंपरा या शाळेने कायम राखली आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. महावीश मुल्ला या विद्यार्थिनीने ९४.२० % गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तिच्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावात असलेल्या आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल मध्ये अनुक्रमे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
प्रथम क्रमांक – कु. महावीश मुल्ला – (९४.२० %),द्वितीय क्रमांक – कु.नील लोकरे – (९३.०० %),तृतीय क्रमांक – कु.झोया पटेल -(९२.८० %) या सर्व विद्यार्थ्यांचे नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल चे चेअरमन श्री मनोज गुळेकर व संचालक मंडळ सदस्य तसेच प्रशालेच्या प्राचार्य श्रीम नीलम डांगे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मधून १० वी बोर्ड परीक्षेला एकूण ८ विद्यार्थी बसले होते.हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे शाळेचा निकाल १०० % लागला असून शाळेचे चागल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
साद काझी – ९१.४० % गुण,हर्षद सुद – ९१.०० % गुण,ओम मोरे – ८९.०० % गुण,ओम पाटील – ८८.४० % गुण,अब्दुल गफार मुकादम – ८६.६० % गुण या सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण दशक्रोशित अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!