कॉम्रेडस मॅरेथॉन स्पर्धा २०२४ ; दक्षिण आफ्रिका येथे ९ जून रोजी संपन्न होणार स्पर्धा
सावंवाडीचा ओंकार पराडकर व कुडाळचा प्रसाद कोरगावकर यांनी सिंधुदुर्गचे नाव केले रोशन
सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील ओंकार पराडकर आणि कुडाळ मधील प्रसाद कोरगावकर या दोन सिंधू पुत्रांची दक्षिण आफ्रिका मध्ये होणाऱ्या कॉम्रेडस मॅरेथॉन साठी जाणाऱ्या भारतीय संघात निवड झाली आहे. हि मॅरेथॉन ९ जून २०२४ रोजी दक्षिण आफ्रिका मधील डर्बन ते मेरिसबुर्ग या दोन शहरांमध्ये होते, सुमारे ९० किलोमीटर अंतर तब्बल १२ तासांच्या आत पार करायचे असते. अत्यंत कठीण आणि चढण असलेला रास्ता एकूण १८०० मीटर उंच चढण धावकांना पार करायचे असते. शरीराची आणि मनाची क्षमता तपासणारी हि मॅरेथॉन जगभरात खूप प्रसिद्द आहे. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी हि ३५००० धावक यात सहभागी होणार आहेत आणि भारतातून ४०० धावक सहभागी होणार आहेत.
या रन मध्ये सहभागी होण्या साठी धावकांना ४२.२ किलोमीटर अंतर ४ तासाच्या आत पार करावे लागते आणि नंतरच संघात निवड होते. प्रसाद ने ४२.२ किलोमीटर अंतर ३ तासात आणि ओंकार ने ४२.२ किलोमीटर अंतर ३ तास ५६ मिनिटात पार करून आपली भारतीय संघात निवड पक्की केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या रन साठी भारतीय संघात स्थान मिळवणारे हे पहिले धावक आहेत. या रन मध्ये उत्तम वेळेत ९० किलोमीटर अंतर पार करून देशासाठी मेडल आणण्याचे स्वप्न मनी बाळगून दोघे ६ जून ला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होतील.
ओंकार आणि प्रसाद ने आता पर्यंत पार केलेल्या स्पर्धा खालील प्रमाणे – १) टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ५० किलोमीटर २) पुणे अल्ट्रा मॅरेथॉन ५० किलोमीटर आणि १०० किलोमीटर ३) हिमालयन खारडुंग ला challange २०२२ : ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन, हि रन जगातील सर्वात उंचावर असलेल्या खारडुंग ला पास रोड वर होते (३ ते १५ डिग्री तापमान आणि फक्त ४०% प्राणवायू) ७२ किलोमीटर ४) देहू ते पंढरपूर रन वारी २०२२ : २६६ किलोमीटर अंतर ५) टाटा मुम्बई मॅरेथॉन २०२४ : ४२.२ किलोमीटर अंतर ६) २४ तास स्टेडियम रन मुंबई २०२२ : २४ तासात १४१ किलोमीटर ७) कोकण कोस्टल मॅरेथॉन २०२४ : अम्बॅसेडर ८) ओंकार आणि प्रसाद ने आता पर्यंत ४ वर्षात १२००० किलोमीटर धावून पूर्ण केले त्यात प्रामुख्याने : ५०० हुन अधिक १० किलोमीटर रन, ३०० हुन अधिक २१.१ किलोमीटर रन, १५ हुन अधिक ४२.२ किलोमीटर रन, ६ हुन अधिक १०० किलोमीटर रनचा समावेश आहे.
कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून या दोघांनी यश संपादन केले. या पुढे योग्य मार्गदर्शक मिळवून, उत्तम ट्रैनिंग देऊन देशाचे प्रतिनिधित्व कसे करता येईल या साठी सिंधू रनर्स टीम प्रयत्नशील राहील.
सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन 3 वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन अश्या आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नाव जगभरात गाजवले आहे.