29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

कणकवली आचरा रस्त्यावर करावा लागतोय जीवघेणा प्रवास

ठेकेदाराचा दुर्लक्ष ; महामार्ग चिखलमय ; दुचाकी घसरून अपघात

कणकवली : कणकवली ते आचरा रस्त्याचे काम सुरू असताना पावसामुळे कणकवली आचरा रस्ता अक्षरशः चिखलमय झाला होता. सध्या कलमठ ते पिसेकामते रस्त्याचे काम सुरू आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर टाकलेल्या मातीमुळे अक्षरशः रस्ता चिखलमय झाला होता. तर झालेल्या चिखलात जवळपास मार्गावरून प्रवास करणाऱ्या मोटरसायकलस्वारांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरुन प्रवास करावा लागत होता.

परंतु काम सुरू असताना ठेकेदाराकडून संबंधित रस्त्याचे काम सुरू असल्याचे सूचना फलक लावणे गरजेचे होते. परंतु अशी कोणतीही कार्यवाही संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहनधारकांमधून संतापजनक प्रतिक्रिया उमटत होत्या. संपूर्ण महामार्ग चिखलाने माखलेले होता. पाऊस सुरू झाला असतानाच हे काम नक्की कधी पूर्ण होणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!