22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

देवगड बाजारपेठ येथे बोलेरो पिकअप व ज्युपीटर मध्ये अपघात ; दुचाकीस्वार गंभीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे कावलेवाडी येथील अमित आत्माराम कावले (३४) हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एमएच ०७, एजे २२२४) घेऊन देवगड बाजारपेठेतून मोंडला जाण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान संदीप परब हा मोटरसायकलने (मोटरसायकल क्र. एम.एच. ०७, एपी १८३१) देवगड बाजारपेठच्या दिशेने जात होते. देवगड बाजारपेठेतील मच्छी मार्केटसमोर अवघड वळणावर कावले यांची बोलेरो पिकअप गाडी आली असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या संदीप परब याच्या मोटरसायकलची धडक बोलेरोच्या चालकाच्या बाजूने बसली. यात संदीप परब हे रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्यांना गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची फिर्याद अमित कावले यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून या अपघातप्रकरणी मोटरसायकलस्वार संदीप परब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार उदय शिरगांवकर करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!