13.2 C
New York
Sunday, November 16, 2025

Buy now

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी ना. नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना! मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आज मतदान आहे, मोदींनी घोषणा केली आहे की, अब की बार ४०० पार. आमचे ४०० खासदार निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणचा, हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावे अशी विनंती नारायण राणे यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!