कणकवली | मयुर ठाकूर : उणिधुनी काढून टोमणे मारायचे काम उद्धव ठाकरे यांनी कणकवलीतल्या सभेत केले. पंतप्रधान मोदींमुळे आज देश विदेशात भारतीय जनतेला सन्मान मिळतो आहे. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मिलिटरी शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश आहे. लोकसभा ही देशाची निवडणूक आहे. कोव्हिडं काळात केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंनी साडेपाच लाख कोटी निधी खर्चुन उद्योगधंदे जिवंत ठेवले. ही लढाई कोकणच्या अस्मितेची लढाई आहे.
नारायण राणेंसारख्या लढाऊ बाण्याच्या नेत्याला निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे. अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव, खा. चंद्रकांत अडसूळ, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते.