13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

ज्याला साधी मच्छर मारता येत नाही तो माणूस आम्‍हाला गाडण्याची भाषा करतो | आ. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

कणकवली | मयुर ठाकूर : कोकणचे खरे विरोधक उद्धव आणि आदित्‍य ठाकरे आहेत. त्‍यांच्यामुळेच कोकणचा विकास होऊ शकला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पाणबुडी प्रकल्‍प वेंगुर्लेत आणणार होते. पण त्‍यावेळी आदित्‍य ठाकरे पर्यटनमंत्री होते. ते पार्ट्यांमध्ये दंग होते. त्‍यामुळेच हा प्रकल्‍प इथे होऊ शकला नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी आज केली. कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात महायुतीची प्रचार सुरू आहे. यात श्री.राणे बोलत होते. ते म्‍हणाले, उद्धव ठाकरे राणे साहेबांना गाडण्याची भाषा करत होते.

आता ज्‍या व्यक्‍तीला मानेवरचं मच्छर मारता येत नाही. त्‍याला पायावर उठायला दोन माणसं लागतात. तो माणूस आम्‍हाला गाडण्याची भाषा करतो. २००५ ची निवडणूक आठवा. कुठल्‍या, कुठल्‍या गल्‍लीतून तुम्‍हाला पळवलं याची आठवण आवर्जून येईल. पण ही निवडणूक आम्‍हाला विकासाच्या मुद्दयावर लढवायची आहे. मोदींना राऊत यांना सन २०१९ मध्ये निवडून दिलं होतं. पण रडण्याच्या पलीकडे त्‍यांनी काहीही केलेलं नाही. एक तरी प्रश्‍न सोडवला का? त्‍याबद्दल त्‍यांनी माहिती द्यावी. फक्‍त राणेंना शिव्याशाप देणं एवढंच काम त्‍यांनी केलं.

ते म्‍हणाले, आज सावंतवाडीकरांना कधी नव्हे ते पेंग्विन पहायला मिळाला. कुठल्‍या अँगलने बाळासाहेबांचा नातू वाटतो. हा माणूस फॉल्‍टी वाटतो. राऊत दहा पैकी सात वर्षे सत्तेत होता. या कालावधीत काय केलं ते सांगा? असेही श्री.राणे म्‍हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!