28.5 C
New York
Wednesday, May 22, 2024

Buy now

कोकणात कोणताही प्रकल्प आला की इथला शिवसेना उबाठाचा खासदार त्याला विरोध करतो | राज ठाकरेंचा राऊतांवर हल्लाबोल

कणकवली | मयुर ठाकूर : भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धव यांनी भाजपची साथ सोडली असती का? नाणारमध्ये कोणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत? विरोधकांच्या भूलथापांना कोकणासीयांना बळी पडायचे आहे का? असे खडे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. कोकणात कोणताही प्रकल्प आला की इथला शिवसेना उबाठाचा खासदार त्याला विरोध करतो. मात्र, त्यांच्याच पक्षाचा आमदाराचा प्रकल्पाला विरोध नसतो, हे काय गौंडबंगाल आहे, असा हल्लाबोल राज यांनी केला.

नारायण राणेंना 5 वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर इथे येण्याची मला गरज नव्हती, असे राज यांनी सांगितले. नुसता लोकसभेतील बाकावर बसणार खासदार हवा की मोंदीच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या खासदार तुम्हाला हवा, याचा विचार कोकणी जनतेने करून नारायण राणेंना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन राज यांनी केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर मैदानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी श्री. ते बोलत होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, माजी खासदार आनंदराव अडसुळ, मनसेचे नेते बाळा नादगांवकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, मनोज चव्हाण, वैभव खेडेकर, आमदार नीतेश राणे, आमदार राजू पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, मनसेचे ज़िल्हाध्यक्ष धीरज परब, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, मनोज रावराणे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मसुरकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
ठाकरे म्हणाले, एखादी गोष्ट मला पटली की मी त्या गोष्टीचे समर्थन करतो. एकदा गोष्ट मला पटली नाही तर त्या गोष्टीचे समर्थन पण करीत नाही. काश्मीरमधील 370 कलम हटविण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले. मोदी सरकारने राममंदिर बांधून राम मंदिरासाठी कारसेवकांचे बलिदान व्यर्थ होऊ दिले नाही. भाजप-शिवसेनेची युती असताना उद्धव ठाकरे हे 7.5 वर्षे सत्तेत होते, मग महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी काय काम केले, असा सवाल राज यांनी केला. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात खूप काही करणे सारखे असून पर्यटनामुळे कोकणातील बेरोजगारी दूर होऊ शकते, असे ठाकरे म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, माझ्या प्रचारासाठी राजे ठाकरे यांना कोकणात येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी क्षणाची प्रतीक्षा न करता मी कोकणात येण्याचे मान्य केले. राज ठाकरे यांनी एकदा शब्द दिला की ते शब्दाला मागे फिरवत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्षांत विकसित भारत व आत्मनिर्भर बनविण्याचे काम केले. देशावासीयांना मोफत धान्य देण्याचे काम मोदी सरकारने केले. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात औषधांच्या खरेदीत 15 टक्के कमिशन खाल्ले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरु ठाकरे यांची लवकरच जेलवारी करणार आहेत. इंडिया आघाडीतील नेतेमंडळी मोदींना शिव्या देत आहेत. राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या फरक काय आहे, हे राणेंनी उपस्थितांना सांगितला. उद्धव ठाकरे हे विकृत माणूस आहेत. मोदी-शहांना शिव्याशाप देण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत, असा अशी टीका राणेंनी केली. राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, विनायक राऊतांवर राणेंनी प्रहार करताना खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये, अशा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांना 40 आमदार सांभाळता आले नाहीत, त्यांनी आम्हाला गाडायाची भाषा करू नये, कारण आम्ही बोलणारी माणसे नाहीत, तर कृती करणारी माणसे आहोत, असा दम राणेंनी दिला. कोणताही परिस्थिती कोकणात मी सिडको येऊ देणार नाही. कोकणात येणा ऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विनायक राऊत हे विरोध करीत आहेत. मोदींनी 400 पारचा नारा दिला आहे, या 400 खासदारांमध्ये मी देखील असणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मला आर्थिकदृट्या सबळ करायचा असल्याने तुमच्या हक्काचा खासदार म्हणून मला लोकसभेत पाठवा, असे आवाहन राणेंनी केले. राज ठाकरे यांना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना श्री देव रामेश्‍वराकडे राणेंनी केली. तत्पूर्वी राणेंनी गेल्या 35 वर्षांत जिल्ह्यात केलेल्या विकासात्मक कामांचा लेखाजोखा मांडला.
हिंदूत्व हा बाळासाहेबांचा प्राण होता. कोकणात येऊन आमच्यावर जर कोणी टीका केली तर त्यांना सोडणार नाही, असा इशारा दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. कोकणाच्या हितासाठी आम्ही सदैव लढत असून यापुढेही लढत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही कोकणच्या स्वाभिमानाची लढाई आहे. ज्यांनी कोकणच्या विकासाला गती दिली. त्यांच्या पाठिशी आपण रहायला हवे.तसेच आपल्या भूमीतील सुपुत्राचा स्वाभिमान राखायला हवा. आपल्या भूमीपुत्राचा कोणी अपमान करत असेल तर त्यांना इथल्या जनतेने जागा दाखवून द्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.

नीतेश राणे म्हणाले, 2005 च्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे हे प्रचारदरम्यान कणकवलीत आले असताना त्यांना गल्लीबोळातून चोरीछुपे फिरावे लागत होते, याचा विसर त्यांना आता पडला आहे. ठाकरे हे आरोग्यदृष्ट्या अनफिट असून ते आम्हाला गाडण्याची भाषा करीत आहेत. 4 जूननंतर ठाकरे यांनी कणकवली येऊन दाखवावे त्यांना सोळो की पळो करून सोडू, असा इशारा राणेंना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे दोन वेळा विनायक राऊत खासदार होऊ शकले. मात्र, मागील 10 वर्षांत त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विकासात्मक काम केले नाही. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे ही कोकणाच्या विकासातील आडवी दोन मांजरे आहेत. अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लांच्या प्रतिष्ठापणेच्या निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्यातील लोकांना वाटण्यात आलेल्या अक्षतेसाठी रेशन दुकानातील तांदूळ म्हणून वापर केला, असा आरोप वैभव नाईक यांनी केला. हा हिंदूधर्मियांचा अपमान आहे, असे सांगतानाच नारायण राणे यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, मोदींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणेंना मतदान करावे, असे आवाहन राणेंनी केली. यावेळी राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या बोलण्याची नक्कल केली. आनंदराव अडसुळ, अबीद नाईक, प्रभाकर सावंत, धीरज परब, मनोज चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. सभेला महायुतीचे कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!