कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. कंकाळ यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी काही आठवड्यांसाठी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी विशाल खत्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कारभाराची मुदत संपल्यामुळे न. पं. च्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा कंकाळ यांची नियुक्ती केली आहे.