दोडामार्ग : परमे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा मर्यादित. भेडशी पंचवार्षिक निवडणुकीत वैभव सहकार परिवर्तन पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले आहे तर सहकार उत्कर्ष पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले आहे
यामध्ये विजयी उमेदवार व मते पुढीलप्रमाणे आहेत
सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिंनीधी म्हणून बेळेकर पांडूरग विनायक 180 मते विजयी, दळवी संजय आबा 142 मते, दळवी सुधीर आबा 162 मते, धरणे उदय आत्माराम. 165 मते, अरुण गौडळकर. 186 मते विजयी, मयेकर नारायण गणू 169 मते, राणे संजय साबाजी 175 मते, सावंत अशोक मुरारी 173 मते,दळवी शैलेश सुरेश 287 मते विजयी, देसाई आत्माराम जीवबा 253 मते विजयी, धुरी गणेश राघोबा 257 मते विजयी, मयेकर लक्ष्मण गणू 267 मते विजयी, नाईक वासुदेव विष्णू 264 मते विजयी,सावंत रामकृष्ण विष्णू 274मते विजयी,
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग जाधव विजय लाडू कदम 300 मते विजयी, महादेव बुधाजी कदम 184मते,
इतर मागास प्रवर्ग रामदास राजाराम मेस्त्री 292 मते विजयी
तळणकर निलेश मनोहर 180 मते
भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी जंगले दत्ताराम धाकू 286विजयी जंगले नाना विठू 200 मते
महिला प्रतिंनिधी श्रीम.वेटे संगिता शेखर 325 मते विजयी
श्रीम.कल्पना बबन बुडकुले 187 विजयी, स्नेहा सुधीर दळवी 164
हे सर्व निकाल निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी उमेश पै यांनी जाहीर केले सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राजन कलगुटकर यांनी काम पाहिले.
सकाळी मतदान केंद्र न्यू इंग्लिश स्कूल भेडशी प्रशालेत असल्याने बुथवर सर्व पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठी सतरा गावची विकास सोसायटी निवडणुक असल्याने राजकीय रंगत वाढलेली होती तसेच संस्थेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक असल्याने सभासद संस्था संचालक निवडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विजयी उमेदवार यांचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई उप जिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, संघटक गोपाळ गवस आदींनी अभिनंदन केले तसेच विजयी उमेदवार यांना आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.