सावंतवाडी : श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त श्री साईभक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे १७ एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी साईंची पूजा, अभिषेक व आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री सिद्धेश्वर उदिन्नाथ भजन मंडळ तळवडे यांचा सुश्राव्य भजन तर रात्री चेंदवणकर गोरे नाट्यमंडळ कवठी कुडाळ यांचा साक्षात्कार गणेश महिमा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई वात्सल्य, साईभक्त मंडळ भवानी चौक सावंतवाडीकडून करण्यात आले आहे.