रोटरी फिजिओथेरपी शिबिराला मोठा प्रतिसाद
फोंडाघाट : येथील रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्यावतीने फिजीओथेरपीचे मोफत शिबिर संपन्न झाले. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय आग्रे उपस्थित होते. आपल्या मनोगत आहेत ते म्हणाले की रोटरी तळागाळात खेडोपाड्यात पोहोचली आहे. आजकाल औषध गोळ्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी फिजीओथेरपी आवश्यक आहे. काही किमान व्यायामाने शरीरातील दुखणे कमी होतात आणि कायमची बरी होतात. खरं म्हणजे त्याची ग्रामीण भागात माहिती नाही या निमित्ताने माहिती आणि आवश्यकता दोन्ही आपल्याला कळते. त्यामुळे अशा शिबिराचा फायदा आपण घेतला पाहिजे. या कामी काही मदत लागल्यास सांगत रहा आणि आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. असे आश्वासन दिले .
सुजाता हळदिवे म्हणाल्या की खऱ्या अर्थाने या उपचार पद्धतीची जास्त ती गरज स्त्रियांना आहे. आजच्या शिबिराला स्त्रियांची संख्या जास्त आहे यावरूनच हे सिद्ध होते. स्त्री विशेषता ग्रामीण स्त्री मागे राहिली ती स्वतः प्रति असणाऱ्या उदासीनतेमुळे स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. रोटरी अध्यक्ष प्रा. जगदीश राणे म्हणाले की समाजसेवा सर्वदूर व तळागाळात पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहरातल्या लोकांना पर्यायी सुविधा असतात. ग्रामीण भागात त्याचीच वाणवा असते. असे प्रतिपादन केले. सुमारे 50 लाभार्थीनी शिबिराचा लाभ घेतला. डॉ. शुक्ला,डॉ. गावडे ,डॉ. मनाली यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या सौ. दळवी, रो. रवी परब, रो, उमा परब,रो. सौ स्नेहलता राणे, रो.पिळणकर रो. मुरकर हे सर्व उपस्थित होते.