सावंतवाडीत हिंदू संघटनांची मागणी; तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर…
सावंतवाडी :संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी, अशी मागणी आज विविध हिंदू संघटनांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. या मागणीसाठी आज हिंदू बांधव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या माध्यमातून संयुक्तरीत्या निवेदन देण्यात आले. यावेळी विनायक रांगणेकर, स्वागत नाटेकर, दिनेश गावडे, किशोर चिटणीस, कृष्णा धुळपनावर, चिन्मय रानडे, दिनेश गावडे, साईराज नार्वेकर, सुनील सावंत, सौ रेवती लेले, सौ. रांगणेकर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.