कणकवली | मयुर ठाकूर : ग्राहक पंचायत कणकवली व सेवानिवृत्त पेन्शन संघटना यांच्यावतीने कलमठ येथील पेन्शनर भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष दादा कुडतरकर, सहसंघटक रिमा भोसले, सहसचिव सुंगधा देवरुखकर, सल्लागार मनोहर पालयेकर, तालुकाध्यक्ष श्रद्धा कदम, राजस रेगे, सुरेश पाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधी सेवा विषयी माहिती रिमा भोसले यांनी दिली. केंद्र शासनाने ग्राहक दिन साजरा करणेसाठी शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण अशी संकल्पना निश्चित केली. त्या अनुषंगाने शाश्वत जीवन शैलीसाठी न्याय संक्रमण ही संकल्पना आहे. या संकल्पनेची माहिती रिमा भोसले सांगितली.
श्रद्धा कदम यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ने दिलेले ग्राहकांना दिलेले हक्क व ग्राहकांची कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. ग्राहकांची होणारी फसवणूक अनेक ठिकाणी केली जाते याची उदाहरणे त्यांनी दिली.
जागतिक ग्राहक हक्क दिनाची मूळ प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिवंगत जॉन एफ केनेडी यांची होती. त्यांनी १५ मार्च १९६२ रोजी यूएस काँग्रेसला एक विशेष संदेश पाठविणेत होता. त्यात ग्राहकांचे हक्काचे मुद्दे ठळकपणे मांडले होते. तेव्हापासून १५ मार्च ही तारीख ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांचे अधिनस्त १९८३ पासून ठरवली.
ग्राहकांनी आपली फसवणूक होऊ नये म्हणून सतर्क, जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन दादा कुडतरकर यांनी करून ग्राहक हक्क दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.