वैभववाडी : वैभववाडीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी विद्या मंदिर करुळ जामदारवाडी प्रशाला व अंगणवाडी केंद्राला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुरुजींच्या भूमिकेत आलेल्या बीडीओ साहेबांच्या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. यावेळी श्री जंगले यांनी विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत दररोज शुध्दलेखन करण्याच्या सूचना दिल्या. जामदारवाडी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी बीडीओ यांच्यासमोर गाणं सादर केलं.
यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, शिक्षक श्री खडसे, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटील व सदस्य उपस्थित होते.