देवगड जामसंडे न.पं.ची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी सायंकाळी न.पं.सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ.मिताली सावंत, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगररचनाकार नाजनीन मोमीन, सहाय्यक नगररचनाकार सोनल अजळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
देवगड जामसंडे शहराच्या प्रारूप विकास आराखड्या संदर्भात ही सभा घेण्यात आली होती.या सभेमध्ये देवगड जामसंडे शहराचा विकास आराखडा समोर ठेवण्यात आला.यावेळी नगररचनाकार नाजनीन मोमीन यांनी आराखड्याबाबत मार्गदर्शन केले व नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या शंकांबाबत निरसन केले.
या प्रारूप विकास आराखड्यामध्ये लोटस् गार्डन, पार्किंग, कोंडवाडा अशा प्रकारे २७ नवीन आरक्षणे, नवीन रस्ते दर्शविण्यात आले आहे.या प्रारूप विकास योजना आराखड्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर सदर आराखडा प्रसिध्द करण्यात येणार असून प्रसिध्द दिनांकानंतर एक महिन्याचा कालावधीत नागरिकांनी सदर आराखड्यावर सुचना व हरकती नोंदवायचा आहेत अशी माहिती मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दिली.