सावंतवाडी : येथील नगरपालिकेच्या माध्यमातून मोती तलावाच्या बाजूला असलेल्या नाल्यात पुन्हा एकदा कृत्रिम प्राणी बसविण्यात आले आहे. यात पट्टेरी वाघ, सांबर, हरणे, बगळे अशा प्राण्यांचा समावेश आहे. ते प्राणी पुन्हा लावण्यात आल्यामुळे त्याचा फायदा पर्यटनाला होणार आहे. तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या काळात हे कृत्रिम प्राणी बसवण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या काळात ते प्राणी खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी काढून टाकण्यात आले होते. परिसरात नाला स्वच्छ राहावा व पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग चांगला दिसावा या उद्देशाने हे काम करण्यात आले होते. मात्र गेले काही दिवस त्या ठिकाणी झाडे झुडपे वाढली होती. त्यामुळे ते खराब झालेले प्राणी काढून टाकण्यात आले होते. परंतु आज ते पुन्हा बसविण्यात आले आहेत.यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रवी जाधव यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार पालिका प्रशासनाकडून हा उपक्रम पुन्हा एकदा राबविण्यात आला.