कणकवली : ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर अतोनात प्रयत्न करून पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी म्हणून वेतोरीन रुजॉय फर्नांडिस ( वय ४९ रा. आरवली टाक ता. वेंगुर्ले ) याला ताब्यात घेऊन शुक्रवारी न्यायलायसमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला ७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी घेऊन गेले होते. आरोपीकडे चौकशी सुरू असताना आरोपी कडून मिळत असलेल्या माहिती विसंगती आढळत असल्याने पुढील तपास करण्यात पोलिसांना अडथळा निर्माण होत आहे. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर तपासात असभागी असलेल्या पोलिसांनी घटनेबाबत माहिती देण्यास नकार दिला. मात्र या घटनेत अन्य साथीदारांच्या सहभाग सासण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी देखील त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपीने खून करून का जाळले ? त्यामागचा त्याचा नेमका हेतू काय होता ? अशा एकना अनेक प्रशांची उत्तरे मात्र अनुत्तरित राहिली आहेत. त्यामुळे आरोपी सापडला तरी घटनेबाबत गूढ मात्र कायम आहे.