म्हापसा : कान्सा – थिवीम येथे ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसून दुचाकी चालक सुजाता साळगावकर (२६, रा. नास्नोळा बार्देश) हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आजच तीचा वाढदिवस होता.
चुकीच्या दिशेने येत असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युवती ट्रकच्या चाकाखाली येऊन काही अंतरावर फरफटत गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी तीला उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. हा अपघात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास कोलवाळ पोलीस करीत आहेत.