24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

महाराष्ट्रातील २५०० वर्ष जुना किल्ला | दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच | जीव धोक्यात घालून ट्रेगिंक करतात ट्रेकर्स

मोरोशीचा भैरवगड… माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगे पासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे.

किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक रचना तयार होतात त्यापैकी एक बालेकिल्ल्या वरील रचना म्हणजे “डाईक” ही रचना आपल्याला भैरवगडा वरती पहायला मिळते.

एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोरलेली वेडीवाकडी कातळवाट. क्लाइंबिंग रॅपलिंग थरारक अशा पायऱ्या चढताना पोटात गोळा येतो.

आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं की चक्कर यावी इतकी हा खोली या किल्ल्याच्या उंचीवरुन दिसते.

भैरवगड किल्ला हजार फूट लांब, चाळीस-पन्नास फूट रुंद, दीड-दोन हजार फूट उंच असा भिंतीसारखा दिसतो.

दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षा उंच असल्याचा दावा केला जात आहे. येथे जाणारे ट्रेकर्स जीव धोक्यात घालून ट्रेगिंक करतात.

भैगवगड किल्ला 2500 वर्ष जुना आहे. ट्रेकिंगसाठी हा अत्यंत कठिण किल्ला मानला जातो.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!