दहा वर्षात येथील खासदाराने काही केले नाही ; निलेश राणेंची विनायक राऊतांवर टीका
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात भाजप युतीची सत्ता येणारच. भाजप चारशे पार होणार. यात आपले हक्काचे खासदार संसदेत हवेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार भाजप महायुतीचे असणार.
दूरदृष्टी असणारे खासदार आता हवेतच. कारण मागील दहा वर्षात येथील खासदाराने काही केले नाही. व्यवस्था बदलणारे खासदार गरजेचे आहेत. आपल्या हक्काचे खासदार दिल्लीत असतील आणि मंत्रीही असतील. असा विश्वास भाजप नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.
आडवली मालडी जिप मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी जिप अध्यक्ष शोभा पांचाळ, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती सिमा परुळेकर, बाळू कुबल, माजी उपसभापती राजु परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा परब, अभि लाड यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.