1.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

विकसित भारताचे स्वप्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत : आ. आशिष शेलार

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : १४० कोटी नागरिकांचा भारत २०४७ ला विकसित भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. देश विकसित होत असताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघ विकसित हवा. म्ह्णून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक विकसित साठी आपल्या हक्काचा खासदार हवा. माझे आवडते नेते असलेले केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा मतदारसंघ विकसित करूया. केंद्र सरकारच्या सर्व योजना या मतदार संघात तळागळापर्यत पोहचवूया. असे आवाहन भाजप नेते मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही आशिष शेलार यांनी चौफेर टीका केली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणात केलेल्या विविध विकास कामे प्रकल्प यांची माहिती देतं राणे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.

तसेच विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान अजरामर असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगित काँग्रेसने काश्मीर मध्ये वेगळा झेंडा वेगळा कायदा केला. ३७० कलम हा डॉ. बाबासाहेबांचा अपमान त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचा इतिहास नागरिकशास्त्र याच्याशी संबंध नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणजे यु टर्न असल्याचा टोला त्यांनी लगावाला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!