बाळासाहेब ठाकरे असली होते उद्धव ठाकरे नकली आहेत
मालवण राठीवडे येथील कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री राणे यांचा विरोधकांवर प्रहार
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : देशासाठी दिवस रात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिका व अन्य विकसित राष्ट्रानी केली. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्व स्तरावर होत असताना चारशे पेक्षा जास्त खासदार विजयी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाची हॅट्रिक पुर्ण होणार. या सोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार भाजप महायुतीच्या चारशे खासदार मधील एक असणार. असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून भाजपवर होत असलेल्या टीकेला कृतीतून उत्तर देणार. असा रोखठोक इशाराही मंत्री नारायण राणे यांनी देत जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक होता. उद्धव ठाकरे यांच्या कंपनीत सगळेच चिटर व कमिशनखोर आहेत. यांचे सर्व कारनामे बाहेर काढणार. कोणतेही विकासकाम न करणाऱ्या येथील खासदाराचे डिपॉझिटही जनता जप्त करेल. असाही हल्लाबोल मंत्री नारायण राणे यांनी केला.
आडवली मालडी जिप मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत राठीवडे येथे संपन्न झाला. यावेळी भाजप नेते मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी जिप अध्यक्ष शोभा पांचाळ, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी सभापती सिमा परुळेकर, बाळू कुबल, माजी उपसभापती राजु परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा परब, अभि लाड यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाळू कुबल, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विचार मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचा गौरव केला.