15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

केसरकरांची सलगी वाढली ; राणेंनी तेलींना बाजूला केले | आ. वैभव नाईक यांच्या हल्लाबोल

कणकवली | मयुर ठाकूर  : लोकसभा निवडणुकीत राणेंचा प्रचार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी त्‍यांच्यापासून सावध राहावे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी आज केले. तसेच दीपक केसरकर आणि राणे यांची सलगी वाढल्‍याने, राजन तेली यांना बाजूला टाकण्यात आले अशी टीकाही त्‍यांनी केली. येथील विजय भवन येथे श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी सतीश सावंत, सुशांत नाईक उपस्थित होते. श्री.नाईक म्‍हणाले, निवडणूक आली की सरपंच यांना धमक्‍या देणे ही राणेंनी जुनी सवयच आहे. मात्र त्‍याबाबतची कल्‍पना भाजप कार्यकर्त्यांना नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत राणेंना पराभव झाल्‍यानंतर सुदन बांदिवडेकर, बाळा वळंजू यांच्याबाबत काय घडले हे राणे समर्थकांना माहिती आहे. मात्र मूळ भाजप कार्यकर्त्यांना त्‍याबाबत माहिती नसावी. त्‍यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी राणेंपासून सावध राहायला हवे.

ते म्‍हणाले, राज्‍यात महाविकास आघाडी सरकार होते. त्‍यावेळी सर्व ग्रामपंचायतींना पक्ष न बघता समान निधी देण्यात आला होता. मात्र आता सत्ताधाऱ्यांना जेथे जास्त मतदान होईल तेथेच निधी दिला जात आहे. आमदार नितेश राणे तसे जाहीरपणे सांगत आहेत. मते न मिळाल्‍यास निधी रोखण्याचीही भाषा ते बोलत आहेत. त्‍यामुळे राणेंना मतदान करताना मतदारांनीच विचार करायला हवा. नाईक म्‍हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्‍याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात सलगी वाढली आहे. त्‍यामुळे भाजपचे नेते राजन तेली यांन पद्धतशीरपणे बाजूला टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सलगीमुळे तेली यांनी आयोजित केलेल्‍या राणेंचा सभा रद्द करण्यात आल्‍या. आता आगामी लोकसभा निवडणुकीत देखील तेलींचा पत्ता निश्‍चितपणे कट्‌ केला जाणार आहे. दरम्‍यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून राणेंना तिकीट मिळविण्यासाठी अजूनही धावपळ करावी लागत आहे. शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीला उमेदवार मिळत नाही. त्यामुळे भाजप कोणाला तरी बळीचा बकरा बनवत आहे, अशी टीकाही श्री. नाईक यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!