कणकवली : भजन कलेस शासन मान्यता मिळावी यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मंत्री माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, मुंबई ना. अॅड. आशिष शेलार याना पत्र दिले आहे.
या पत्रात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन कलेची फार मोठी परंपरा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भजन रसिक व कलाकार आहेत. सदर कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या व भजन परंपरा जोपासण्याच्या अनुषंगाने भजन कलेस राजाश्रय दर्जा मिळण्याबाबत अध्यक्ष, राजश्री शाहूमहाराज कलाकार मानधन समिती, सिंधुदुर्ग यांनी निवेदन दिले आहे. भजन कलेस राजाश्रय दर्जा देण्यास शासन मान्यता मिळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही व्हावी असे, मंत्री माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, मुंबई ना. अॅड. आशिष शेलार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.