मंत्री ना. नितेश राणे यांनी पत्राद्वारे वेधले मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष
कणकवली : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलाकार मानधन सन्मान योजनेमध्ये इष्टांक क्षमता वाढविणेबाबत राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्रालय, मुंबई मंत्री ना. आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करून लक्ष वेधले आहे.
सदर पत्रात असे म्हटले आहे की, राज्य शासनाने राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलाकार मानधन सन्मान योजना यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये केवळ १०० इष्टांक इतकेच असून त्यानांच फक्त या योजनेचा फायदा मिळत आहे. सदर योजनेअंतर्गत २०० वा त्यापेक्षा जास्त इष्टांक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. जेणेकरुन जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ साहित्यीक व कलाकारांना याचा फायदा होऊ शकेल. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्य व कलाकार मानधन सन्मान योजनेमध्ये इष्टांक क्षमता वाढविण्याबाबत आवश्यक व योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे.