जिल्हा नियोजन बैठकीत खा. नारायण राणे यांच्या सूचना; निधी खर्च करून चालणार नाही, लोकहिताच्या योजना राबवा
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत, त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील नागरिकाच्या जीवनात परिवर्तन व्हावे, यासाठी आपण आहोत. निधी खर्चाबाबत काम करण्याची गरज आहे, कामात कमी पडू नका. विकास कामे न होणे ही बदनामी जिल्ह्याची आणि प्रशासनाची आहे. चांगले काम करणाऱ्यांना आदर्श अधिकारी, कर्मचारी असे पुरस्कार द्यावेत, मात्र कामचुकार करण्यांवर कारवाई करा. सिंधुदुर्गातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी काम करुयात, असे मार्गदर्शन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजनच्या सभागृहात जिल्हा नियोजनाची पहिली बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी खा. नारायण राणे बोलत होते, या बैठकीला माजी मंत्री दीपक केसरकर, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधिक्षक सौरक्षकुमार अग्रवाल, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, नियोजन अधिकारी यशवंत बुधवळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खा. नारायण राणे म्हणाले, सामूहिक काम महत्वाचे आहे. एक माणूस कोणतेच काम करू शकत नाही. पालकमंत्र्यांना सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे आणि चांगले सामूहिक काम केल्यास जिल्हा राज्यात अव्वल राहिल. जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे यांनी सर्वच अधिकाऱ्यांची शाळा घेतली. चुकीची आणि मोगम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. भविष्यात हा जिल्हा विकसित व्हावा आणि चांगली विकासकामे व्हावीत अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पालकमंत्री जोमाने काम करतील. कुठेही असलो तरी या ठिकाणच्या जनतेचे जीवन जवळून पाहतो. त्यामुळे आमच्या लोकांना चागले जीवन देण्याची, रस्ते, पाणी वीज, शिक्षण या बरोबरच जनतेच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना जनतेपर्यंत पोचवा. तुम्ही अधिकारी काम करण्यासाठी आहात. होणार.. करणार.. अशी उत्तरे नकोत. जिल्हयाचे अर्थकारण शेती आणि पिशुसंवर्धनच्या माध्यमातून वाढविण्यावर भर द्या. यावर काम करा. अनेक योजना शासनाच्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोचवा. आम्ही आकडेवारी ऐकण्यासाठी आलेलो नाही. काम करून दाखविले पाहिजे. अनेक अधिकारी पाहिले आहेत. मात्र काम तुम्ही अधिकारी करत नसतील तर त्यांना घरी बसवा राज्यात काम करणाऱ्या बेरोजगारांना तरी संधी मिळेल. योजना सामान्य जनतेसाठी आहेत, असे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी ठाकर समाजाच्या प्रश्नावर लक्ष वेधले. दाखल्यानसाठी पावरा नावाचा अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे दाखले अडवतात. त्यांच्या संदर्भात मंत्री उईके यांच्या दालनात बैठक लावण्यात आलेली आहे. त्या अधिकाऱ्यांना त्या जागेतून काय करायचे याचा निर्णय घेतो असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांचेच ठेकेदार असतात त्यामुळेच कामे प्रलंबित राहतात आणि त्याला आपण मुदत वाढ देतो. काम प्रगती पथावर म्हणजे काय ? किती टक्के काम झाले हे त्या टीपणी मध्ये नोंद करा अशा सूचना खासदार नारायण राणे यांनी दिल्या. यावेळी आमदार निलेश राणे यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्याशी निगडित एका प्रश्नावर धारेवर धरले. जनतेशी नीट बोला नीट वागा, कागद किंवा दिलेले पत्र फेकून मारता इतका उट्टपना येतो कुठून? जिल्हा परिषद प्रशासन म्हणजे कोण ऑपरेटिंग एजंसी आहे. यापुढे तोंडावर पेपर मारले तर सहन करणार नाही आणि लोकांना उर्मट बोलले तर एकूण घेणार नाही असा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला.
आ. राणेंची जिल्हा नियोजनमध्ये आक्रमक भूमिका
पहिल्याच जिल्हा नियोजन बैठकीत आ. निलेश राणे यांनी विविध मुद्दयांवर परखड भूमिका मांडली, त्यामध्ये अखर्चित निधी, जिल्हा परिषद मधील मुख्यकार्यकारी अधिका-यांना थेट टार्गेट निलेश राणे यांनी केले. कामकाजामध्ये सुधार करा, असे सांगितले. निधी खचार्वाबत अधिका-यांना विचारणा केली. जलजीवन मध्ये भ्रष्टाचार आहे. कामे न होताच बिले काढली, असे चालणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला. जिल्हा नियोजच्या बैठकीत अधिकारी धारेवर जिल्हा नियोजनच्या पहिल्याच बैठकीत तिनही राणेंनी अधिकाऱ्यांच्या कामचुकारांबद्दल कडक शब्दांत भूमिका घेतली, अखर्चित निधी, सर्वसामान्यांसाठी आवश्यक नियोजन, जिल्हा परिषदचा कारभार यावर पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांनी अधिका-यांना धारेवर धरले. प्रशासनाने सतर्क राहिले पाहिजे. योजना राबवताना जनतेच्या जीवनात परिवर्तन घडेल, त्यासाठी नियोजन करा, अशा सुचना पालकमंत्री नितेश राणे यांनी केल्या.