कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक संजय दराडे उद्या वार्षिक तपासणीसाठी देणार भेट
कणकवली : येथील पोलीस ठाण्याला रंगरंगोटी केल्याने कणकवली पोलीस ठाणे आणि परिसराचा कायापालट झालेला दिसून येत आहे. याच निमित्त आहे ते म्हणजे वार्षिक तपासणीसाठी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक संजय दराडे हे उद्या कणकवली पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर पेवर ब्लॉक बसवण्याबरोबरच इमारतीच्या भिंतीवर सिंधुदुर्गची अध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वैशिष्टये दाखवणारी चित्रे काढली रेखाटली आहेत.