मसुरे : सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी भेट घेतली. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी सन २००६ ते २०१८ पर्यतच्या १०४ जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय एक वेतनवाढीचा प्रश्न प्रामुख्याने मांडला.हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री महोदयांनी दिले.तसेच सविस्तर चर्चेसाठी भेटीचे निमंत्रण दिले. लढा मंच प्रमुख जेष्ठ शिक्षक श्री.शिवराज सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे स्वागत व अभिनंदन केले,तसेच निवेदन दिले.या भेटीवेळी श्री.शामसुंदर सावंत,श्री.आनंद जाधव,श्री.सचिन जाधव,श्री.बाबाजी झेंडे,सौ.शर्वरी सावंत आदी उपस्थित होते. आजच्या भेटीचे नियोजन श्री.आनंद जाधव आणि श्री.सचिन जाधव यांनी केले होते.