1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

सुट्ट्या पैशांवरुन वाद होणार नाहीत!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा नामी तोडगा ; प्रवासीही खुश अन् कंडक्टरही..

कणकवली ( मयुर ठाकूर ): सुट्ट्या पैशांवरुन प्रवाशांच्या तक्रारी आणि वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सुट्ट्या पैशांवरुन वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री सरनाईक यांनी केली होती.

त्यानुसार महामंळाने यूपीआय पेमेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

यूपीआय पेमेंटद्वारे उत्पन्न तिकीट (दर वाढण्यापूर्वी)
२१ जानेवारी २०२५ – ८७ लाख ५८ हजार ६०
२२ जानेवारी २०२५ – ८६ लाख ५० हजार ९०५
२३ जानेवारी २०२५ – ८४ लाख २३ हजार २५
२४ जानेवारी २०२५ – ६७ लाख ३६ हजार १८

यूपीआय पेमेंटद्वारे उत्पन्न तिकीट (दर वाढल्यानंतर)
२६ जानेवारी २०२५ – १ कोटी ५३ लाख ५ हजार ८६४
२७ जानेवारी २०२५ – १ कोटी ४६ लाख ४ हजार २७२
२८ जानेवारी २०२५ – १ कोटी २५ लाख १८ हजार ८३
२९ जानेवारी २०२५ – १ कोटी १९ लाख ८२ हजार ८४१
३० जानेवारी २०२५ – १ कोटी २५ लाख ८० हजार ८७१

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!