कणकवली : शहरातील समर्थनगर येथील रहिवासी सौ.ज्योती राजीव पाध्ये (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. पुणे येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पूर्वीचे रूग्णवाहिका व्यावसायिक तथा पुरोहित राजीव पाध्ये यांच्या त्या पत्नी तर पाध्ये मेडिकलचे संजू पाध्ये यांच्या त्या वहिनी होत. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.