1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

दिव्यांगांनी हरित उर्जेवर चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सिंधुदुर्ग या महामंडळाकडून राबविण्यात येणारी सन 2024-25 वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होणाच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोबाईल (शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबबातच्या योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींनी 6 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही लोहकरे यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश – दिव्यांग व्यक्तींना पुरेसा सोयी –सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार, कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.

योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी पोर्टल दि. 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले असून दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://register.mshfdc.co.in या लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकव्दारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी सायं. 6 वाजेपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे अवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग व विकास महामंडळा मार्फत करण्यात येत आहे.
००००

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!