1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

कनेडी येथे उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली : भारतीय जनता पक्षाच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयाचा २७ वा वर्धापन दिन आणि सांगवे, नाटळ, भिरवंडे दशक्रोशी माघी गणेश जयंतीनिमित्त कनेडी येथे २६, २७, ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे मत्स्त्योद्योग व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रेरणेतून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक तथा जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी सांगितले.

२६ व २७ जानेवारी रोजी सकाळी १० पासून कनेडी – सांगवे माध्यमिक विद्यालयात बेसिक रोबोटिक्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत मुंबई येथील दत्तात्रय उर्फ सागर सावंत मार्गदर्शन करणार आहेत. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. कनेडी बाजारपेठ येथे हळदीकुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी ६ वा. गणेश मूर्तीचे मिरवणुकीने आगमन होणार आहे. ७ वा. हरिपाठ, रात्री ८ वा. नितीन आसयेकर प्रस्तुत ट्रिकसीनयुक्त ‘भक्त शिरोमणी संत कबीर’ हे दशावतारी नाटक, १ रोजी सकाळी ७ पासून गणेशाची स्थापना व पूजा, सत्यनारायण पूजा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, २ वा. अभिषेक शिरसाट, अमेय आर्डेकर, योगेश पांचाळ, दुर्गेश मिठबावकर, अमित हुमरमळेकर, चंद्रकांत माजगावकर, बापू रासम यांची भजने होणार आहेत. सायंकाळी ६ वा. कीर्तन, रात्री ९ वा. कलारंजना-मुंबई निर्मित व उदय साटम यांच्या संकल्पनेतून व दिग्दर्शनातून ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कलाविष्कार. २ रोजी रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत वैभव नानचे, सागर मेस्त्री, विनोद चव्हाण आदींची भजने होणार आहेत. ८ वा. गणेश पूजन, ९ वा. अवधूत मेस्त्री, नामदेव गिरकर, प्रथमेश मोरये, अमोल चव्हाण यांची भजने, दुपारी १२ वा. नैवेद्य, २ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाटक होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!