1.6 C
New York
Tuesday, February 11, 2025

Buy now

कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदी भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत महाविकास आघाडीच्या माजी आमदार वैभव यांना मोठा झटका दिला आहे. या विजयानंतर महायुतीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडाळमध्ये आमदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फोडत नगरपंचायतीपदी भाजपच्या नगराध्यक्ष निवडून आणला आहे. भाजपच्या प्राजक्ता बांदेकर शिरवळकर यांनी मविआच्या सई काळप यांना पराभूत केलं आहे. निवडणुकांआधी महायुतीच्या पारड्यात मविआकडे ९ तर महायुतीकडे ८ नगरसेवक होते. मात्र आमदार निलेश राणेंनी लढवलेल्या कल्पकतेमुळे मविआचा एक नगरसेवक फुटण्यात यशस्वी झाले.

पुढच्या सर्व निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजय मिळवू अशा प्रकारचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला. यानंतर आमदार निलेश राणे म्हणाले अडीच वर्ष कुडाळ शहराचा विकास रखडला होता आणि म्हणूनच इथला महाविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला आहे. आम्हाला राजकारण नाही तर कुडाळचा विकास महत्त्वाचा आहे असेही आमदार निलेश राणे म्हणाले. या विजयानंतर आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष केला. आगामी काळात होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हापरिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाची निवडणूक नांदी ठरेल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!