कणकवली : पोलिसांनी कणकवली शहरातील मटका बुकीवर कारवाई करत रोख रक्कम ३९०० व पावती पुस्तक, बॉल पेनसह अन्य साहित्य जप्त केले आहे. पटकीदेवी बौद्धवाडी नजीक पत्र्याच्या स्टॉल मध्ये दुपारी १ वाजून १० मिनिटे च्या सुमारास कल्याण मटका खेळवत असताना मनोज तात्या हर्णे ( वय ४५ रा. पटकीदेवी मच्छीमार्केट, कणकवली ) याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार आघाव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश शेडगे, हवालदार सुभाष शिवगण, कॉन्स्टेबल राजकुमार आघाव यांनी ही कारवाई केली.