17 C
New York
Tuesday, March 11, 2025

Buy now

नागवे हद्दीत रेल्वे रुळावर सापडलेला तो मृतदेह कंरजे येथील मंगेश बोभाटे यांचा

कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर बुधवारी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. दोन दिवसांपासून त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. अखेर तो मृतदेह करंजे तेलीवाडी येथील मंगेश तुकाराम बोभाटे ( वय – ४५ रा. करंजे तेलीवाडी ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सदर मृतदेहाची ओळख मयत मंगेश बोभाटे यांचा मुलगा प्रथमेश बोभाटे ( वय २० ) याने पटवली.

घटनेत मयत झालेले मंगेश बोभाटे हे मोलमजुरी करायचे. तर त्यांना मद्याचे व्यसन होते. बुधवारी देखील ते मद्यपान केलेल्या अवस्थेत होते. बुधवारी कणकवली येथून मंगेश बोभाटे हे घरी गेले होते. ओरत तिथून ते घरी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. दरम्यान बुधवारी सायंकाळी नागवे हद्दीतील रेल्वे रुळावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

दोन दिवस शोधाशोध करून ते सापडले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात असलेला मृतदेह दाखविण्यात आला असता त्यांच्या मुलाने सदरचा मृतदेह आपल्या वडिलांचाअसल्याचे सांगितले. मंगेश बोभाटे यांच्या कुटुंबात दोन मुली, एक मुलगा , भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. ओळख पटविल्यानंतर पुढील कार्यवाही करून मृतदेह बोभाटे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!